Latest

UP Election Result: युपीमध्‍ये काँग्रेसच्‍या ९७ टक्‍के तर बसपच्‍या ७२ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्‍त

नंदू लटके

लखनौ : पुढारी ऑनलाईन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सलग दुसर्‍यांदा सत्ता काबीज केली. ( UP Election Result ) समाजवादी पार्टीने भाजपला जोरदार टक्‍कर दिली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक नामुष्‍की ओढवली ती काँग्रेस पक्षावर. या पक्षाने उत्तर प्रदेशमध्‍ये पुन्‍हा सक्रीय होण्‍याचा प्रयत्‍न केला. काँग्रेसने राज्‍यात एकुण ३९९ जागांवर निवडणूक लढवली. यातील तब्‍बल ३८७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त झाले. बहुजन समाज पार्टीने ४०३ जागावर उमेदवार उभे केले. यातील २९० मतदारसंघात बसपच्‍या उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त झाले आहे.

UP Election Result : काँग्रेसपेक्षा आरएलडीच्‍या मतांची टक्‍केवारी अधिक

मतदानाच्‍या टक्‍केवारीचा विचार करता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २.४ टक्‍के मते मिळाली. तर प्रादेशिक पक्ष राष्‍टीय लोकदल ( आरएलडी ) या काँग्रेसपेक्षा अधिक २.९ टक्‍के मते मिळाली आहे.

भाजप, सपाच्‍या उमेदवरांचेही 'डिपॉझिट' जप्‍त

दुसर्‍यांदा सत्तेत आलेल्‍या भाजपच्‍या उमेदवारांचेही डिपॉझिट जप्‍त झाले आहेत. भाजपचे ३७६ जागांवर उमेदवार उभे केले होते. यातील तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त झाले आहेत. समाजवादी पार्टीच्‍या ३४७ उमेदवारांपैकी ६ जणांचो डिपॉझिट जप्‍त झाले आहे.
अपना दल आणि निषाद पार्टीच्‍या एकाही उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त झाले नाही. दोन्‍ही पक्षांचे एकुण २७ उमेदवार निवडणूक रिंगणार होते. या पक्षांनी आपले प्रस्‍थ असणार्‍या मतदारसंघांमध्‍येच उमेदवार दिले होते. त्‍यामुळे दोन्‍ही पक्षांच्‍या उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त झालेले नाही.

उमेदवारांचे डिपॉझिट केव्‍हा होते जप्‍त ?

निवडणूक नियमानुसार, निवडणुकीला उभा राहिलेल्‍या उमेदवाराला मतदारसंघातील एकुण मतंच्‍या १/६ ( १६.६ टक्‍के ) मते मिळणश आवश्‍यक असते. यामध्‍ये संबंधित उमेदवार अपयशी ठरल्‍यास त्‍याने जमा केलेले डिपॉझिट (अनामत रक्‍कम ) जप्‍त केले जाते. उत्तर प्रदेशमध्‍ये एकुण चार हजार ४४२ उमेदवार निवडणुकीत उभे होते. यातील तब्‍बल ८० टक्‍के म्‍हणजे ३ हजार ५२२ उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT