Latest

UP Crime: उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेते, पत्रकार आशुतोष श्रीवास्त यांची गोळ्या झाडून हत्या

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि.१३) सकाळी एका भाजप नेता आणि पत्रकार आशुतोष श्रीवास्तव यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. (UP Crime) या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सकाळी अज्ञात दुचाकीस्वारांनी जौनपूर जिल्ह्यातील (UP Crime) कोतवाली भागातील सभारहाड बाजारात भाजप नेते आणि सुदर्शन न्यूजचे वार्ताहर आशुतोष श्रीवास्तव यांची गोळ्या झाडून हत्या केली. गोळी लागून जखमी झालेल्या पत्रकाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

UP मध्ये पत्रकार, भाजप नेत्याच्या हत्यासंदर्भात ठळक मुद्दे

  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीमध्ये तणावाचे वातावरण
  • जौनपूर जिल्ह्यातील पत्रकार आणि भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
  • मतदारसंघात प्रचारासाठी निघाले असतानाच अज्ञातांकडून हत्या
  • गोळ्यांचा आवाज ऐकताच लोकांची घटनास्थळी गर्दी

उत्तर प्रदेशातील साबरहाड (जि.जौनपूर) गावात राहणारा आशुतोष श्रीवास्तव (४५) हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. आज (दि.१३) सकाळी ते प्रचारासाठी दुचाकीवरून निघाले होते. यावेळी सकाळी नऊ वाजता अज्ञात दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवली. यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्याव ४ गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. जवळच्या लोकांना गोळ्यांचा आवाज आल्याने लोक घटनास्थळी जमले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शहागंज सार्वजनिक (UP Crime) आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर शहागंजचे आमदार रमेश सिंह आणि इतर भाजप नेते तेथे पोहोचले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पोलिस अधिकारी अजित सिंह चौहान या प्रकरणाचा तपास करत आहेत. तक्रारीच्या आधारे गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT