Latest

Ujjain Mobile Blast : चार्जिंगसह बोलणे सुरू असताना मोबाईलचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू!

अमृता चौगुले

उज्जैन; वृत्तसंस्था : चार्जिंगला लावून बोलत असताना मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. स्फोट इतका मोठा होता की, डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. हातही धडापासून वेगळा झाला. मध्य प्रदेशातील उज्जैनपासून 40 कि.मी.वरील बडनगर या गावात ही भयावह घटना घडली. (Ujjain Mobile Blast)

दयाराम बारोड (वय 68) असे मृताचे नाव आहे. ओप्पो कंपनीच्या या मोबाईल फोनचे तुकडे जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत. बारोड शेतातील घरात एकटेच राहत होते. मित्र दिनेश चावडा यांच्यासोबत ते इंदूरसाठी निघणार होते; पण बारोड अजून आले नाहीत म्हणून फोन केला तर तो बंद होता. नंतर चावडा हे स्वतः बारोड यांच्या शेतातील घराकडे गेले. तेव्हा समोरील द़ृश्य पाहून त्यांना धक्का बसला. (Ujjain Mobile Blast)

चार्जिंग दरम्यान स्फोट का शक्य? (Ujjain Mobile Blast)

  1. चार्जिंग दरम्यान फोनमध्ये रासायनिक बदल होतात. यावेळी फोनवर बोलण्याने, गेम खेळल्याने बॅटरी गरम होते व स्फोट होतो.
  2. चार्जिंगदरम्यान फोनच्या आजूबाजूला किरणोत्सर्गाचे प्रमाणही वाढलेले असते. अशावेळी बॅटरी स्फोटाची शक्यता बळावते.

हे लक्षात ठेवा; हे करा, हे करू नका

  • फोन ओव्हरलोड करून ठेवू नका. भरपूर अ‍ॅप्स, डाऊनलोड नको
  • खूप अ‍ॅप्स आणि कंटेट असेल, तर मोबाईल लवकर गरम होतो
  • मोबाईल फोनची मेमरी 75 ते 80 टक्क्यांपर्यंत मोकळी ठेवा
  • डुप्लिकेट चार्जरमुळे बॅटरी खराब होते व लवकर गरम होते
  • चार्जिंग सुरू असताना गेम खेळू नका, फोनवर बोलू नका

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT