Latest

Hanuman Jayanti : बाबा महाकालांनी भस्‍म आरतीवेळी दिले हनुमान स्‍वरूपात दर्शन

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : आज देशभरात हनुमान जयंती hanuman jayanti मोठ्या उत्‍साहात साजरी करण्यात येत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर उज्‍जेनच्या महाकाल मंदिरात बाबा महाकाल यांची विशेष सजावट करण्यात आली. आजच्या भस्‍मारतीवेळी बाबांना श्री हनुमानजींच्या स्‍वरूपात सजावट करण्यात आली. भांग, मेवा आणि विविध सुक्‍यामेव्यांचा वापर करून ही विशेष आकर्षक पूजा बांधण्यात आली. यावेळी बाबांच्या हनुमान स्‍वरूपाला नवीन मुकुट आणि मुंडमाला घालण्यात आली.

जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात hanuman jayanti चैत्र शुक्‍ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीच्या मंगळवारी भस्‍मआरतीवेळी सकाळी चार वाजता मंदिराचे कपाट उघडण्यात आले. यावेळी पुजारींनी गर्भगृहात स्‍थापित प्रतिमांचे पूजन केले. महाकाल यांना जलाभिषेक, दूध, दही, साखर आणि फळांच्या रसांनी बनवलेले पंचामृताने अभिषेक करण्यात आला. प्रथम घंटा वाजवून हरि ओमचे जल अर्पित करण्यात आले. कर्पूर आरतीनंतर बाबा महाकाल यांना चांदीचा मुकूट, रूद्राक्ष आणि मुंड माला धारण करण्यात आल्‍या.

आजच्या सजावटीचा विशेष भाग म्‍हणजे मंगळवारच्या भस्‍मआरतीवेळी बाबा महाकाल यांना श्री हनुमान स्‍वरूपात hanuman jayanti सजवण्यात आले होते. भांग, मेवा आणि ड्रायफ्रूट्सच्या माध्यमातून त्‍यांची सजावट करण्यात आली. या सजावटीनंतर बाबा महाकाल यांच्या ज्‍योर्तिर्लिंगाला भस्‍म आरती करण्यात आली आणि प्रसादाचा भोग दाखवण्यात आला. महानिर्वाणी आखाड्याकडून महाकाल यांना भस्‍म अर्पित करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी बाबा महाकाल यांच्या दिव्य दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर जय श्री महाकाल च्या जयघोषाने भरून गेला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT