पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी (दि.१०) निकाल देणार आहेत. याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर मोठे भाष्य केले आहे. न्यायमूर्तीच आरोपीला दोन वेळा भेटले. त्यामुळे आरोपींना भेटणाऱ्या न्यायमूर्तीकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवणार ? असा सवाल करून लोकशाहीची हत्या होती की काय ? अशी भीती ठाकरे यांनी व्यक्त केली. ते मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते. MLA Disqualification Case
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल देण्याची वेळ आली असताना या भेटीवर ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अध्यक्ष किती मुख्यमंत्र्यांना भेटायला जात नाहीत. तर मुख्यमंत्री अध्यक्षांच्या भेटीला जात असतात, असे यावेळी आमदार अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केले. MLA Disqualification Case
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आतापर्यंत वेळकाढूपणा केला आहे. वारंवार तारीख देणे हा वेळकाढूपणा आहे. नार्वेकर बुधवारीही वेळकाढूपणा करतील, पण हे योग्य नाही. कोणत्या दबावाला बळी न पडता न्याय मिळाला पाहिजे, हे जनतेला दाखवून द्या, लोकशाही जिवंत राहिल की नाही, हे उद्या कळेल. लोकशाहीचा खून होण्याची भीती वाटत आहे. मुख्यमंत्री शिंदे आमच्यासाठी आरोपी आहेत. आणि त्यांना अध्यक्ष नार्वेकर भेटत असतील, तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढा देऊ, असे ठाकरे म्हणाले.
ज्या पद्धतीने या केसेची हाताळणी होत आहे. यावरून लोकशाहीची खून होतो की काय अशी चिन्हे दिसू लागली आहे. लवाद म्हणून विधानसभा अध्यक्षांनी निकालापूर्वी घटनाबाह्य सरकारची भेट घेतली. म्हणजे न्यायमूर्तीच आरोपीची भेट घेताहेत. न्यायमूर्ती जर आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर आम्ही यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा ठेवायची? असा सवाल ठाकरे यांनी केला.
हेही वाचा