Latest

आरक्षण विधेयकाबद्दल अभिनंदन, पण सरकारवर भरोसा ठेवणे कठीण : उद्धव ठाकरे

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ;  कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवर भरोसा ठेवणे कठीण आहे, अशी प्रतिक्रीया शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली .

संबंधित बातम्या 

उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारच्या हेतूवर आत्ता तरी संशय घेणार नाही. पण मराठा समाजातील अनेकांना यासाठी बलिदान द्यावे लागले. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्यावर लाठीचार्ज व्हायला नको होता. यापूर्वी 2018 साली आणि आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आला तेंव्हा एकमताने त्याला पाठिंबा दिला आहे. पूर्वीचे अनुभव लक्षात घेता टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीत दुमत नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण टिकण्याची हमी सरकारने घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही हमी दिली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

SCROLL FOR NEXT