पुढारी ऑनलाईन : कामानिमित्त पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे राहणारे दोन बिहारी तरुण इंद्रायणी नदीत बुडल्याची घटना घडली आहे. या दोन्ही युवकांच्या शोधकार्याला 48 तासांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. शक्तिमान कुमार आणि सोनू कुमार अशी बुडालेल्या युवकांची नावं आहेत. हे दोन्ही तरुण मोशी येथील एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत आहे.
हे दोघेही शनिवारी सकाळी इंद्रायणी नदीत पोहायला गेले होते. बराचकाळ न परतल्याने रूममेट या दोघांनाही शोधण्यासाठी नदीकाठावर गेला असता त्यांचे कपडे मिळून आले. यानंतर संबंधित तरुणाने पोलिसांना कळवले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :