Latest

जेरुसलेममधील ‘त्‍या’ चर्चच्‍या चाव्‍या मुस्‍लिम कुटुंबाकडे! सर्वधर्मसमभाव परंपरा | Israel Hamas war

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडल्‍याने जगाचे टेन्‍शन वाढलं आहे. मागील सात दिवसांच्‍या संघर्षामध्‍ये इस्रायलमधील मृतांची संख्या १,३०० हून अधिक तर १,९०० हून अधिक पॅलेस्टिनींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या रक्‍तरंजित संघर्षाची सर्वत्र चर्चा सूरु असतानाच इस्रायलची राजधानी जेरुसलेममधील एक पवित्र चर्च पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. कारण या चर्चच्‍या प्रवेशद्वाराच्‍या चाव्‍या एका मुस्‍लिम कुटुंबाकडे आहेत. गेली ८५० वर्षांपेक्षा अधिक काळ या चर्चच्या चावीची जबाबदारी ही कुटुंबं सांभाळतात. (Jerusalem's Church of the Holy Sepulchre)

२०१६ मध्‍ये 'सीएनएन'ने याबाबतचे वृत्त दिले होते.  इस्‍त्रायल-हमास संघर्षाच्‍या पार्श्वभूमीवर चर्च ऑफ द होली सेपल्चरच्‍या पंरपरेविषयी…

जेरुसलेम हे शहर ख्रिस्ती, मुस्लिम आणि ज्यू धर्मियांसाठी पवित्र मानले जाते. देशातील यहुदी (ज्‍यू ) धर्मामध्ये या शहराला सर्वांत पवित्र तर इस्लाम धर्मामध्ये तिसरे सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. तर येशूंचे उपदेशाचे ठिकाण, येशू ख्रिस्ताना क्रुसावर चढवले जाणे, त्यानंतर त्यांचे पुनरुत्थान या घटानांमुळे हे शहर ख्रिस्ती धर्मियांसाठीही पवित्र ठिकाण आहेत. या शहरात अनेक ऐतिहासिक ख्रिस्ती वास्तू आहेत. याचपैकी एक असणारे चर्च ऑफ द होली सेपल्चर हे ख्रिश्चनांसाठी सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक ठिकाण आहे. जेरुसलेममधून क्रुसेडरांना हाकलून देणार्‍या अय्युबिड राजवंशाचा संस्थापक सलादीन याने त्याची स्थापना केली असावी, असे मानले जाते. येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान याच ठिकाणी झाले होते, असे काही ख्रिस्ती परंपरा सांगतात.  (Jerusalem's Church of the Holy Sepulchre)

चर्च ऑफ द होली सेपल्चरची काळजी घेणारी मुस्लिम कुटुंबे

चर्च ऑफ द होली सेपल्चरच्या प्रवेशद्वाराची काळजी मुस्लिमांकडून घेतली जाते. ऐतिहासिक नोंदीनुसार, दोन मुस्लिम कुटुंबांना ८५० वर्षांहून अधिक काळ हे कर्तव्य सोपवण्यात आले आहे. १५ जुलै ११४९ रोजी तयार केलेल्या चाव्या जेरुसलेममधील दोन मुस्लिम कुटुंबांना पौराणिक अय्युबिद सुलतान सलादीन यांनी सोपवल्या होत्या. १० फेब्रुवारी ११८७रोजी, सलादीनने जौदेह अल-हुसेनी कुटुंबाला चाव्यांचा रक्षक म्हणून नियुक्त केले. नुसीबेह कुटुंबाला चर्चच्‍या प्रवेशद्वाराची काळजी घेण्‍यास नियुक्‍त केले. तेव्हापासून, दोन्ही कुटुंबांनी या कर्तव्याचा सन्मान करणे सुरू ठेवल आहे. आजही तो कायम आहे.

जौदेह कुटुंबाकडे चावी रक्षणाची प्रभारी आहे, तर दुसरे मुस्लिम कुटुंब दरवाजा उघडण्याची आणि ख्रिस्ती धर्मियांना चर्चमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्याचे काम करते. ती जबाबदारी आता वाजीह नुसीबेह यांच्यावर आहे.

Jerusalem's Church of the Holy Sepulchre : जगातील सर्व मुस्लिमांसाठी हा सन्मान…

२०१६ मध्‍ये वृत्तसेवा 'सीएएन'च्‍या प्रतिनिधींनी जौदेह कुटुंबातील एका वंशजाची मुलाखत घेतली होती. यावेळी त्‍यांनी नमूद केले होते की, "पूर्वजांना सोपवलेले हे महत्त्वाचे कर्तव्य पार पाडत आहे. हा कौटुंबिक वारसा आहे. केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे तर सन्मानाची गोष्ट आहे. जगातील सर्व मुस्लिमांसाठी हा सन्मान आहे. माझ्यासाठी, इस्लामिक आणि ख्रिश्चन धर्मांच्या सहअस्तित्वाचा स्त्रोत चर्च ऑफ होली सेपल्चर आहे. आम्ही एकत्र राहतो आणि शांतता आणि प्रेम याची शिकवण देतो. जो खरा इस्लाम धर्म आहे."

धार्मिक महत्त्वामुळे जेरुसलेमचे नियंत्रण शतकानुशतके वारंवार बदलले आहे. चर्च ऑफ द होली सेपल्चरच्या प्रवेशद्वाराची दोन मुस्लिम कुटुंबांनी घेतलेली जबाबदारी आजही टिकून आहे. १५१६ मध्‍ये ऑट्टोमन तुर्कांनी जेरुसलेमचा ताबा घेतला तेव्हाही कुटुंबांनी त्यांची कर्तव्ये कायम ठेवली. विशेष म्‍हणजे जौदेह कुटुंबाकडे ऑट्टोमन सुलतानकडून त्यांच्या कायद्यातील कर्तव्ये समाविष्ट करणारा लिखित करार आहे.  चर्च ऑफ द होली सेपल्चरच्या चाव्या जुन्या आहेत. जौदेह कुटुंबाकडे दोन चाव्‍या आहेत. त्‍यातील एक किमान 850 वर्षे जुनी आहे आणि आता तुटलेली आहे, तर नवीन चावी जी अजूनही वापरात आहे ती सुमारे 500 वर्षे जुनी आहे. किल्लीमध्ये त्रिकोणी आकाराचे धातूचे हँडल आणि चौकोनी टोक असून ज्याची लांबी 12 इंच आहे.

विविध ख्रिश्चन संप्रदायांमधील संघर्षामुळे निर्णय

चर्चच्या प्रवेशद्वाराच्‍या चाव्‍या मुस्लिम कुटुंबांना सोपवण्याचा निर्णय चर्च ऑफ द होली सेपल्चरमधील विविध ख्रिश्चन संप्रदायांमधील संघर्ष कमी करण्यासाठी घेण्‍यात आला होता. तेव्हापासून, ही परंपरा अशा शहरातील धार्मिक समभावाचे प्रतीक ठरली आहे, आज ही परंपरा  मानवतेला सर्वर्धमसमभावाची शिकवण देते.

Jerusalem's Church of the Holy Sepulchre :  अशी आहे परंपरा…

नुसीबेह हे दररोज पहाटे चर्च ऑफ होली सेपल्चरमध्‍ये पोहचतात. ते जौदेह यांच्‍याकडून चर्चेच्‍या प्रवेशद्वाराच्‍या चावी घेतात. यानंतर प्रवेशद्वाराचे वरील कुलूप उघडण्यासाठी लहान लाकडी शिडीवर चढतात. यानंतर दरवाज्‍या खालील भागात असलेले कुलूप उघडतात. यानंतर चर्च अभ्यागतांसाठी खुले होते. सायंकाळीही चर्च बंद करताना पुन्‍हा एकदा अशीच प्रक्रिया राबवली जाते. दोन मुस्लिम कुटुंबांनी शतकानुशतके ही जबाबदारी सामायिक केली आहे, पवित्र स्थळाचे संरक्षण करणे आणि ते ख्रिश्चन धर्मियांना ते खुले ठेवले आहे. हे तणावाने भरलेल्या जेरुसलेम शहरात चर्च ऑफ द होली सेपल्चरमधील ही परंपरा सर्वधर्मसमभागाचे खर्‍या अर्थाने शिकवणे देते जी शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे. इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडल्‍याने पुन्‍हा एकदा इस्‍त्रायलमधील हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT