Latest

Disha Vakani : ‘तारक मेहता’ फेम दयाबेनला कॅन्सर झाल्याचे वृत्त

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही जगतातील सर्वात दीर्घकाळ सुरु असलेला कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' लोकांना आजदेखील आवडतो. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे आहे. (Disha Vakani) विशेष म्हणजे, दयाबेन. दयाबेन ही भूमिका साकारणारी दिशा वकानी सध्या शोपासून दूर आहे. मागील काही दिवसांपासून असे वृत्त होते की, दयाबेन शोमध्ये वापसी करणार आहे. परंतु, ती न येण्याचं कारण समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दयाबेन उर्फ दिशा वकानीला कॅन्सर झाला आहे. (Disha Vakani)

दयाबेनला कॅन्सर

दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मालिकेमधील दीर्घकाळ सुरू असलेल्या त्यांच्या बोलण्याच्या पद्धती, विचित्र आवाजामुळे दिशाला ही समस्या झाली आहे. मालिकेत दयाबेनच्या विशिष्ट स्टाईलने बोलण्याविषयी २०१० मध्ये तिला विचारण्यात आले होते. त्यावेळी दिशा म्हणाली होती की, प्रत्येक वेळी एकाच आवाजात सातत्य ठेवणे खूप कठीण आहे. परंतु, परमेश्वराची कृपा आहे की, माझ्या आवाजाला कुठलेही नुकसान झाले नाही. तिने हेदेखील सांगितले होते की, ती रोज ११-१२ तास सलग शूटिंग करायची.

दिशा शोमधून गेल्यानंतर …

ही मालिका मागील १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदीला अद्यापही दुसरी दयाबेन मिळालेली नाही. दरम्यान, हीदेखील चर्चा आहे की, या टीव्ही मालिकेत ऐश्वर्या सखुजा किवा काजल पिसल या दोघींपैकी एक जण दयाबेनची भूमिका साकारू शकतील. पण, अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

SCROLL FOR NEXT