Latest

Arvind Trivedi : रामायण मालिकेतील ‘रावण’ अरविंद त्रिवेदी यांचे निधन

स्वालिया न. शिकलगार

रामायण मालिकेमध्ये रावणची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) मागील काही दिवस आजारी होते. हार्ट ॲटॅक आल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचा पुतण्या कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.

अरविंद यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलंय. रामायण मालिकेत राम अर्थातचं अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विट करुन त्‍यांना श्रध्‍दांजली वाहिली. 

सुनील लहरीने त्रिवेदी यांचे दोन फोटो ट्विट केलंय. 'आपल्या सर्वांचे प्रेमळ अरविंद भाई  आता आपल्यात राहिले नाहीत. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो…माझ्याकडे शब्द नाही. मी एका वडिलांसमान व्यक्तीला गमावलंय. माझे मार्गदर्शक, शुभचिंतक आणि सज्जन व्यक्त‍ी.'

दीपिका चिखलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून लिहिलंय- 'त्यांच्या परिवारांप्रती माझ्या संवेदना… ते एक खूप शानदार व्यक्ती होते..'

त्रिवेदी यांच्या निधनाची उडाली होती अफवा

याआधी मे महिन्यात अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा उडाली होती. त्यावेळी सुनील लहरी यांनी या वृत्ताचे खंडन केलं होतं. सुनील यांनी पोस्ट शेअर करून म्हटलं होतं की, आजकाल कोरोनामुळे कोणती ना कोणती वाईट बातमी ऐकायला मिळते. अफवा पसरवण्यांना माझी प्रार्थना आहे की, कृपया याप्रकारच्‍या अफवा पसरू नका. परमेश्वराच्या कृपेने अरविंद जी ठीक आहेत. मी प्रार्थना करतो की, परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य देवो.'

३०० हिंदी-गुजराती चित्रपटांमध्ये काम

अरविंद यांचा जन्म मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरात झाला होता. त्यांनी गुजराती रंगमंचापासून आपल्‍या करिअरची सुरुवात केली होती. गुजराती सिनेमामध्ये अनेक वर्षे त्यांनी काम केलं. त्यांनी सुमारे ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अभिनयामध्‍ये चमकदार कामगिरी केल्‍यानंतर ते राजकारणातही सक्रीय झाले हाेते.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT