Latest

Turkey earthquake update : तुर्कीच्या दुसऱ्या भूकंपात  ३ ठार, २०० हून अधिक जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांमध्ये हाहाकार माजवलेल्या भूकंपाने तुर्कस्तान काल (दि. २०) पुन्हा एकदा हादरला आहे. सोमवारी (दि. २०) तुर्कस्तानच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.४ इतकी मोजली गेली आहे. लेबनॉन आणि इस्रायल या भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास १० सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात ३ ठार, २१३ जखमी झाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Turkey earthquake update )

६ फेब्रुवारीच्या पहाटे तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला. आग्नेय कहारनमारस भागात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. ७.८ रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची होती. तुर्कस्तान आणि शेजारच्या सीरियामध्ये हे भूकंप झाले. अनेक इमारती ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याचे चित्र दिसून आले. या दुर्घटनेत मृतांचा आकडा ४६ हजारांच्या पुढे गेला आहे. तुर्कस्तान सरकारने कहारनमारस आणि हाताय वगळता सर्व राज्यांमधील बचाव कार्य थांबवले आहे. 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारतातून तुर्कीला पाठवलेली एनडीआरएफची टीमही परत आली आहे.

Turkey earthquake update : बचाव कार्य सुरू

पहिल्या भूकंपाची दाहकता असतानाच तुर्कस्तानमध्ये झालेल्या दुसऱ्या भूकंपाने हादरवलं आहे. यात किमान ३ ठार, २१३ जखमी लोक झाले आहेत. असं एका वृत्तसंस्थेला तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले आहे. सुलेमान सोयलू यांनी असही सांगितलं आहे की, तीन ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT