पुढारी ऑनलाईन: ऑस्ट्रेलियातील न्यू कॅलेडोनियाजवळ शुक्रवारी (दि.१८) दुपारी १ वाजताच्या सुमारास ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपामुळे प्रशांत महासागरात मोठ्या लाटा निर्माण होत आहेत. या महाभयंकर भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी ४.१५ वाजता ऑस्ट्रेलियातील हवामान ब्युरोने लॉर्ड होवे बेटाला त्सुनामीचा (Tsunami warning) इशारा दिला आहे.
ऑस्ट्रेलियातील हवामान ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, या बेटावर साधारण ३०० हून अधिक रहिवाशी आहेत. येथील वानुआतुच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने लोकांना किनारी भागातून उंच ठिकाणी हलवण्याचा सल्ला प्रशासनाला (Tsunami warning) दिला आहे. कार्यालयाने सांगितले की, लोकांनी त्सुनामी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे रेडिओ ऐकावे आणि इतर सावधगिरीचे उपाय करावे.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाविषयी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, भूकंपाचा केंद्रबिंदू हा लॉयल्टी बेटांजवळ, फिजीच्या नैऋत्येला, न्यूझीलंडच्या उत्तरेला आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आहे जेथे कोरल समुद्र पॅसिफिकला मिळतो. तसेच या भूकंपाचा केंद्रबिंदू ३७ किलोमीटर (23 मैल) खोलीवर (Tsunami warning) असल्याचे देखील सांगितले आहे. ज्याठिकाणी हा भूकंप झाला तो 'रिंग ऑफ फायर' चा भाग आहे. हा प्रशांत महासागरातील भूकंप पट्टा आहे, जिथे जगातील बहुतेक सर्वात मोठे भूकंप होतात, असे देखील यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियन त्सुनामी चेतावणी केंद्र दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान फिजी, किरिबाती, पापुआ न्यू गिनी, गुआम आणि इतर पॅसिफिक बेटांवर लहान लाटा येण्याची शक्यता आहे. तरप्रशांत महासागराच्या किनारपट्टीवर प्रचंड उंच लाटांसह, किनारपट्टीच्या भागात मजबूत आणि असामान्य पाण्याच्या प्रवाहांचा अनुभव येईल. यामुळे काही प्रमाणात पूर देखील येईल, असे न्यूझीलंडच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने स्पष्ट केले आहे.
लॉर्ड होवे ऑस्ट्रेलियातील ज्वालामुखी बेट (Tsunami warning) आहे. हे बेट १५४० हेक्टर परिसरात पसरले आहे. या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे महत्त्वाचे बेट मानले जाते.