पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : न्यूझीलंडमध्ये गुरुवारी सकाळी 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये के करेमाडेक द्वीप समूहात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. जमीनीखाली 10 किलोमीटरपर्यंत याचे क्षेत्र होते. तसेच समुद्रात भूकंप आल्याने विशेषज्ञांचे मत आहे की भूकंप केंद्रापासून 300 किलोमीटरच्या परिसरात त्सुनामी येऊ शकते.
दरम्यान, अद्याप तरी या भूकंपाने जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. 2023 या वर्षात सातत्याने भूकंपाची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी तुर्की सीरियात झालेल्या भूकंपात हजारोंवर माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान आणि अन्य ठिकाणी देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत.
हे ही वाचा :