Latest

Tripti Dimri : कियारा नव्हे तर तृप्ती दिसणार ‘भूल भुलैया ३’ मध्ये, कार्तिक आर्यनसोबत रोमान्स

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'भूल भुलैया ३' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. आतापर्यंत या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री विद्या बालन आणि माधुरी दिक्षित दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नेमकी कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार यांची माहिती मिळालेली नव्हती. आधीच्या 'भूल भुलैया २' मध्ये कार्तिकसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी दिसली होती. याचदरम्यान कियारा नसून आता आणखी एका नव्या अभिनेत्रीचा चित्रपटात एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. ( Tripti Dimri )

संबंधित बातम्या 

नुकतेच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ुपहिल्यांदा त्याने एका अभिनेत्रीचा अर्धा फोटो शेअर केलाय. तर अर्धा फोटोत अभिनेत्रीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. याशिवाय फोटोत कार्तिकच्या आगामी 'भूल भुलैया ३' चित्रपटाचे शीर्षक लिहिले आहे. एका टेबलावर केक, काही मेणबत्त्या, कंदिल यासारख्या अनेक गोष्टी दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने "हा चक्रव्यूह सोडवा. 'भूल भुलैया ३' मिस्ट्री गर्ल. बरं", असे लिहिले आहे. शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोत तृप्तीचा चेहरा दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत. दरम्यान काही नेटकऱ्यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल'मध्ये दिसलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी ( Tripti Dimri ) असल्याचे बोलले जात आहे.

तर काहींनी रुहबाबाच्या आयुष्यातील वहिनी नंबर २ येत असल्याचेही म्हटले आहे. मात्र, खरोखरंच कार्तिकसोबत तृप्ती डिमरी दिसणार आहे की नाही? यांची महिती अद्याप समोर आलेली नाही. या चित्रपटात काही दिवसापूर्वी माधुरी दीक्षित दिसणार असल्याची वृत्त मिळाले होते. ती चित्रपटात भूताची भूमिका साकारणार आहे.

SCROLL FOR NEXT