Latest

Amin Sayani : अमीन सयानी यांना राज्यपालांकडून श्रद्धांजली

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल रमेश बैस यांनी प्रसिद्ध रेडिओ उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आकाशवाणी व रेडिओ सिलोन वरील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत अमीन सयानी यांनी हजारो सांगीतिक कार्यक्रम व जिंगल्स सादर करून जगभरातील रसिकांची मने जिंकली. 'बहनो और भाईयो' ही त्यांची उद्घोषणा देखील अतिशय लोकप्रिय ठरली.

सयानी यांच्या अनोख्या शैलीमुळे रेडिओ सिलोन वरील गीतमाला व इतर कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्या निधनामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील एक महान रेडिओ उद्घोषक व आवाजाचा जादूगार गमावला आहे, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT