राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांची निर्दोष मुक्तता | पुढारी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांची निर्दोष मुक्तता

अलिबाग ः पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेली साखर ठेवण्यात आलेले गोदाम फोडल्याप्रकरणी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी एस.डब्ल्यू. उगले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांची निर्दोष मुक्तता केली.

संबंधित बातम्या 

केंद्र सरकारने पाकिस्तानातील साखर निर्यात केली होती. ती स्थानिक साखरेपक्षा किलोमागे एक रुपया स्वस्त दाराने विकली जात होती. त्याला शेतकर्‍यांचा विरोध होता. 14 मे 2018 रोजी याविरोधात आंदोलन करण्यात आले. ज्या गोदामांमध्ये ही पाकिस्तानी साखर ठेवण्यात आली हाती त्या गोदामांमध्ये घुसून साखरेच्या गोणी फोडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह काही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणाचा खटला पनवेल येथील मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांच्या न्यालयात सुरू होता. त्यानंतर हा खटला अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात वर्ग करण्यत आला.

या खटल्याच्या सुनावणीत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुख्य न्याय दंडाधिकारी एस.डब्ल्यू. उगले यांनी आमदार जितेंद्र आव्हाड व आनंद परांजपे यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अ‍ॅड. प्रवीण ठाकूर व अ‍ॅड. गणेश केळुसकर यांनी आरोपींची बाजू मांडली.

Back to top button