Latest

Bihar News : पाटणा दिवाणी न्यायालयात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; एकाचा मृत्यू, २ जखमी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील पाटणा दिवाणी न्यायालयात बुधवारी (दि.१३) दुपारी एका ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यादरम्यान ट्रान्सफॉर्मरजवळ उभे असलेले तीन वकील गंभीररित्या भाजले. यात एका वकिलाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवेंद्र प्रसाद असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग विझवण्याचे काम सुरू केले. या दुर्घटनेनंतर वकिलांनी न्यायालयाच्या आवारात आंदोलन सुरू केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक वकिलांची समजूत काढली. दरम्यान, ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल लीक होऊन स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT