Latest

Tomatoes Price : टोमॅटो १०० रुपये किलो झाला; आवक कमी झाल्याचा परिणाम

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून भाजी मंडईत टोमॅटोची आवक (Tomatoes Price) घटली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात ६०-७० रुपये प्रतिकिलो टोमॅटोचे दर होते. आज पुणे, मुंबई घाऊक मार्केट आणि किरकोळ मार्केटमध्ये ८०-१०० रुपये प्रतिकिलो टोमॅटोचे दर झालेले आहेत. जर टोमॅटोची आवक वाढली नाही, तर १०० रुपयांच्याही पुढे टोमॅटो जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नियमितपणे सर्वाधिक मागणीमध्ये टोमॅटो (Tomatoes Price) आहे. पावभाजी, सॅलॅड आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित केली जाते. त्यामुळे वर्षभर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मुंबईत सातारा, पुणे, नाशिकसह दक्षिणेतील राज्यांमधूनही टोमॅटोची आवक होत असते; मात्र, १५ दिवसांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये टोमॅटोची कमतरता निर्माण झाली आहे. तेथेही महाराष्ट्रातून टोमॅटो पाठविला जात आहे. मागणी वाढली मात्र यंदाचं टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटो वधारला आहे.

यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटोच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवकही कमी झालेली आहे. पण, लग्नसराईचा सिझन सुरू असल्यामुळे टोमॅटोला चांगलीच मागणी वाढली. परंतु, तुलनेने पुरवठा बाजारात होत नाही. परिणामी, मागील दोन दिवसांत टोमॅटोचे दर १०० रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. मागील २ वर्षांपूर्वी हाच टोमॅटो केवळ ५-७ रुपये किलोंवर विकला गेला होता. मात्र, या दरात उत्पादनाचा खर्चही न निघल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता.

पहा व्हिडीओ : वाढत्या गॅस दराला कंटाळून महिलांनी पुन्हा पेटवल्या चुली
SCROLL FOR NEXT