Latest

World Post Day : दोन शतकांपासून संदेश वहनाची सेवा देणा-या पोस्टाचा आज दिवस

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : World Post Day सध्या डिजिटल युग सुरू आहे. त्यामुळे आपल्या प्रियजनांचे किंवा कामाचे संदेशच नाही तर जगभरात घडणा-या गोष्टींची माहिती आपल्या तळहातावर येऊन ठेपली आहे. मात्र, डिजिटल क्रांतीपूर्वी तब्बल दोन शतके आपला संदेश आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना आपल्याशी जोडून ठेवणारा, तसेच अन्य महत्वाचे संदेश संबंधित व्यक्तिपर्यंत पोहोचवून जगाला जोडून ठेवणारा महत्वाचा घटक म्हणजे टपाल खाते अर्थात पोस्ट. आज जागतिक पोस्ट दिवसानिमित्त जाणून घेऊ की आजच्या दिवशी हा दिवस का साजरा केला जातो.

1874 मध्ये बर्न, स्वित्झर्लंड येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

World Post Day जागतिक पोस्ट दिवस: इतिहास

तसे पाहता आदिम समाजातून माणूस जसा नागर बनला तेव्हा पासून संदेश वहनाची कोणती ना कोणती व्यवस्था प्रत्येक नागर समाजात होती. जुन्या काळात संदेश वहनासाठी प्राणी पक्षांचा वापर केला जात असे. त्यासाठी खास शिकारी पक्षी तयार केले जात असत किंवा कबुतरांना तयार केले जात असे. अनेकदा गुप्त संदेश वापरण्यासाठी देखिल पक्षांचा वापर केला जात असे. आपल्याकडे चाणक्याने ज्या मगध सत्ताधीश धनानंदाचा नाश करवून चंद्रगुप्ताला भारताचा सम्राट बनवले होते. त्या धनानंदाच्या अमात्याने मगधात सूचनांचे इतक्या मोठ्या प्रमाणात जाळे विनले होते की प्रत्यक्ष ग्रीक आक्रमक सिकंदरालाही धनानंदाशी शत्रूत्व मोल न घेतलेलेच बरे असे वाटले. जुन्या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये संदेश वहनाची वेगवेगवळी व्यवस्था होती.

World Post Day मात्र, 17 शतकातील साम्राज्यवादी नितीतून आणि वाढीस लागलेल्या दळणवळणाच्या साधनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टल प्रणाली उदयास येऊ लागली आणि विविध राष्ट्रांमध्ये पसरली. 1800 च्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय पत्र विनिमयाच्या संथ वाढीसह, जागतिक पोस्टल प्रणाली प्रथम उदयास आली. हे कष्टाळू आणि धीमे होते, परंतु 1874 मध्ये यूपीयूची स्थापना झाल्यानंतर, ते काम करू लागले.

भारतात 1854 मध्ये कोलकाता येथून अधिकृत टपाल सेवा सुरु झाली. आजच्या युवापिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटींग्जचे महत्व भासत नाही. एकेकाळी नागरिकांसाठी पत्र म्हणजे सर्वकाही होते. गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाईफ लाईन होती. टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.

तसेच स्वातंत्र्यानंतर भारतीय टपाल खात्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. अतिशय दूर्गम भागात संदेश वहनाचे टपाल हे एकमेव साधन होते. पत्र लिहिणे ही एक कला यामुळे उदयास आली. 20 व्या शतकाच्या शेवटपर्यंत पोस्ट खाते लोकांसाठी संदेश पाठवण्याचे एक महत्वाचे साधन होते. नंतर 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये तंत्रज्ञान युगाला सुरुवात झाली तस तसे लोक टेलिफोन, नंतर मोबाईल, ई मेल आदी साधनांचा वापर वाढवू लागली. भारतात मोबाईल क्रांती झाल्यानंतरही टपाल खाते संदेश पोहोचवण्याचे लोकप्रिय साधन होते. मात्र, 21 व्या शतकाच्या सुरुवातीला डिजिटल क्रांती झाली आणि संदेश वहनासाठी पोस्ट अर्थात टपाल खाते क्वचितच काही ठिकाणी आता वापरले जाते.

World Post Day तरीही टपाल खाते नव्या युगाशी जोडून घेताना नवीन सेवांची जोडणी करत स्वतःला अद्ययावत ठेवत आहे. भारतात हळूहळू टपाल खाते बँकिंग साठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी ओळखले जाऊ लागले आहे. तसेच अजूनही वेगवेगळे उपक्रम राबवत अजूनही संदेश वहनाचे कार्य करत आहेत. २०२२ मधील जागतिक पोस्ट दिनासाठी 'पोस्ट फॉर प्लॅनेट' ही थीम असेल. लॉजिस्टिक्सच्या बाबतीत पोस्ट अतुलनीय आहे. दरवर्षी, जागतिक पोस्ट दिन 150 हून अधिक देशांमध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये, जागतिक पोस्ट दिवस सशुल्क सुट्टी म्हणून साजरा केला जातो.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT