Latest

‘तिरूपती बालाजी’च्या व्हिआयपी दर्शनाच्या वेळेत बदल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : तिरूपती बालाजी देवस्थानाकडून व्हिआयपींसाठीच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. हा बदल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होईल. सामान्य नागरिकांना लवकरात लवकर बालाजीचे दर्शन मिळावे, यासाठी तिरूपती बालाजी देवस्थानचे चेअरमन व्हाय. वी. सुब्बा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वस्थ मंडळाच्या निर्णयानंतर देवस्थानकडून व्हिआयपींच्या दर्शनाच्या वेळांमध्ये बदल करण्यात येत आहे.

सध्याच्या घडीला व्हिआयपी दर्शनासाठी पहाटेच्या वेळेची सर्वांत जास्त मागणी केली जाते. पहाटे सव्वा पाच ते आठ वाजेदरम्यान व्हिआयपी तिरूपतीच्या दर्शनासाठी येत असतात. दरम्यान या वेळेत बदल करत देवस्थान व्हिआयपी दर्शनासाठी सकाळी आठ ते बारा हा वेळ ठरवला आहे.

दररोज सकाळी व्हिआयपी दर्शनासाठी येत असल्याने भाविकांना दर्शनासाठी तासंतास वाट पहावी लागते. व्हिआयपींमुळे भाविकांना तिरूपतीचे दर्शन घेण्यासाठी बराच उशीर होतो. यानंतर तिरूपती बालाजी देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला असून व्हिआयपींच्या दर्शन घेण्याच्या वेळेत बदल करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT