Latest

IMD : मुंबई, ठाणे, रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी ऑनलाईन ; येत्‍या ३ ते ४ तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्‍ह्यासह काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्‍याचेही हवामान विभागाने म्‍हंटलंय. तर काही भागात हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काल रात्रीपासून मुंबईसह कल्‍याण, डोंबिवली, ठाण्यामध्ये तसेच अनेक उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज (बुधवार) सकाळी देखील पाऊस सुरूच आहे. त्‍यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडाली. त्‍यातच हवातान विभागाने पुढील तीन ते चार तासात पावसाचा अंदाज वर्तविल्‍याने मुंबईकरांना आज या बदलल्‍या हवामानाचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT