Latest

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत 'लष्कर ई तोयबा' या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी आज (दि.२०) दिली. १ एके ४७ रायफल आणि २ पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.

शोपियानचे लतीफ लोन, नेपाळचे टिल बहादूर थापा, काश्मिरी पंडित पुराण कृष्ण भट आणि अनंतनागचे उमर नझीर यांच्या खून प्रकरणात ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी २ दहशतवादींचा हात होता. शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तेथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. शोपियान जिल्ह्यातील झैनापोरा येथील मांज मार्ग भागात ही चकमक झाली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT