हा 2022 चा भारत; 1962 चा भारत नव्हे! | पुढारी

हा 2022 चा भारत; 1962 चा भारत नव्हे!

धर्मशाळा, वृत्तसंस्था : आजचा भारत हा 2022 चा भारत आहे. हा भारत 1962 मधील भारत नव्हे, हे चीनने लक्षात ठेवावे, असे खडे बोल बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनला सुनावले. चीनशासित तिबेटमध्ये परतण्याचा आता विषयच नाही. मला भारत आवडतो, असेही लामा म्हणाले.

भारत-चीनमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालेला आहे. दलाई लामा यांच्यासह तवांग मठातील भिक्कू अन्य आचार्यांची त्यावरील प्रतिक्रिया समोर आली आहे. लामा यांच्यासह तवांग बौद्ध मठातील अन्य भिक्कूंनीही हा 2022 चा भारत आहे, असा इशारा चीनला दिला आहे.

कांगडा हेच आता माझे निवासस्थान आहे. दलाई लामा हे हिमाचल प्रदेशातून सोमवारी रवाना झाले. मंगळवारी ते गुरुग्राममधील सलवान एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेला भेट देणार आहेत. नंतर बिहारमधील बौद्ध गया येथे जातील.

देशात मोदी सरकार!

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. ते चीनला सोडणार नाही. माझा भारत सरकार आणि भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे. तवांग सुरक्षित राहील, असे तवांगमधील बौद्ध मठाचे लामा येशी खावो यांनी सांगितले.

तवांग मठ आशियात दुसरा

तवांग मठ 1681 पासून असून, तो आशियातील दुसरा सर्वात मोठा आणि जुना मठ आहे. तवांग मठातील भिक्कूंनी 1962 च्या युद्धात भारतीय सैन्याला मदत केली होती.

Back to top button