Latest

Dhananjay Munde : छगन भुजबळांपाठोपाठ धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन

अविनाश सुतार

परळी, पुढारी वृत्तसेवा : मंत्री छगन भुजबळ यांना ज्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन धमकी देण्यात आली, त्याच मोबाईल क्रमांकावरुन मंत्री धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांच्या परळीतील संपर्क कार्यालयात सोमवारी सायंकाळी फोन करुन ५० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी या व्यक्तीने दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक कराड यांनी हा फोन रिसीव्ह केला होता. यानंतर त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन नंबर ट्रेस केला असता हा क्रमांक रायगड जिल्ह्यातील महाड येथील असल्याचे समोर आले. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी टीम रवाना केली असता सदर आरोपीस भुजबळ यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले. आता पुणे पोलिसांकडून या आरोपीस ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT