Devendra Fadanvis : पंकजा मुंडेंच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर फडणवीसांचे मोठे विधान म्हणाले… | पुढारी

Devendra Fadanvis : पंकजा मुंडेंच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर फडणवीसांचे मोठे विधान म्हणाले...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Devendra Fadanvis : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘मी भाजप सोडणार नाही’, असे स्पष्ट केल्यानंतरही या चर्चांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. पंकजा मुंडे या भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार का असा प्रश्न अजूनही उपस्थित केला जात आहे. एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील झाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत आणि त्या भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार आहे, अशी चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी यावर महत्वाचे स्पष्टीकरण दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांची काही वैयक्तिक मते आहेत. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यात सामील झाल्यानंतर. आमच्या लोकांचे राष्ट्रवादीशी भांडण झाले आहे हे बरोबर आहे आणि ते सर्व जण एकाच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारू शकत नाहीत. पक्षाचे वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांच्याशी बोलतील आणि मला विश्वास आहे की त्या आमच्या पक्षासोबत काम करतील. Devendra Fadanvis

हे ही वाचा :

Devendra Fadnvis : “मी कधीच विसरत नाही…” देवेंद्र फडणवीसांनी दिले पवार, ठाकरेंना उत्तर (व्हिडिओ)

देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर… : एकनाथ खडसे

Back to top button