Latest

black hole : ‘या’ चिमुरड्याला उलगडायचे आहे कृष्णविवरांचे रहस्य

Arun Patil

वॉशिंग्टन : लहान वयातही आपल्या असामान्य बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणारी अनेक मुलं असतात. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामधील अशाच एका नऊ वर्षांच्या मुलाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करून सोडले आहे. हा नऊ वर्षांचा मुलगा हायस्कूलमधील सर्वात तरुण पदवीधरांपैकी एक बनला आहे. त्यासोबतच त्याने महाविद्यालयीन पदवीसाठी क्रेडिट मिळवण्यासही सुरुवात केली आहे. डेव्हिड बालोगुन (black hole) असे या नऊ वर्षांच्या मुलाचे नाव आहे.

डेव्हिडने डिस्टन्स लर्निंगद्वारे हॅरिसबर्गमधील रीच सायबर चार्टर स्कूलमधून डिप्लोमा मिळवला आहे. डेव्हिडने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या आवडत्या शिक्षकांना, तसेच विज्ञान आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंगवरील (black hole) प्रेमाला दिले. आयुष्य जगण्यासाठी काय करायला हवं हे मला आधीपासूनच माहिती आहे, असे त्याने एका टी.व्ही. चॅनेलच्या मुलाखतीत सांगितले.

तसेच, मला खगोल भौतिकशास्त्रज्ञ व्हायचे आहे आणि मला कृष्णविवरे आणि सुपरनोव्हाचा अभ्यास करायचा आहे, असेही त्याने सांगितले. डेव्हिडचे पालकही उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे उच्च पदवी आहे. तरीही अशा विलक्षण बुद्धीच्या मुलाचे संगोपन करणे अत्यंत कठीण आहे. त्याची आई रोनिया बालोगुन यांनी सांगितलं की, तो 9 वर्षांचा लहान मुलगा आहे. ज्याच्याकडे अनेक संकल्पना समजून घेण्याची क्षमता असलेली बुद्धी (black hole) आहे. जी कधी त्याच्या वयाच्या पलीकडे तर कधी माझ्या समजण्याच्या पलीकडचे असते. डेव्हिडच्या शिक्षकांनाही त्याच्यावर खूप अभिमान आहे.

त्यांनीही आपल्या आवडत्या विद्यार्थ्याकडून खूप काही शिकायला मिळाल्याचे कबुल केले आहे. (black hole) त्याचे विज्ञान विषयाचे शिक्षक कोडी डेर यांनी सांगितलं की तो एक प्रेरणादायी मुलगा आहे. त्यामुळे तुमची शिकवण्याबाबत विचार करण्याची पद्धत नक्कीच बदलते. इतकेच नाही तर डेव्हिड हा मेन्सा हाय इन्टेलिजन्स सोसायटीचा सदस्य आहे. तसेच, रीच चार्टर स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर त्याने एका सत्रासाठी बक्स काऊंटी कम्युनिटी कॉलेजमधून शिक्षण घेतले. शिक्षणाव्यतिरिक्त डेव्हिड मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट मिळविण्यासाठी प्रशिक्षण घेतो आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT