Latest

Mysterious Shiva temples : कुणीही उलगडू शकले नाही ‘या’ मंदिरांचे रहस्य

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची समृद्ध संस्कृती, संपत्ती, इतिहास आणि अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा एक असा देश आहे, जिथे मंदिरांच्या मागील कहाणी अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. (Mysterious Shiva temples) महाराष्ट्रातील कैलास मंदिर असो वा तामिळनाडूतील ऐरातेश्वर किंवा ओडिशातील लिंगराज आजपर्यंत 'या' खास मंदिरांचे कोडे सुटलेले नाही. वर्षानुवर्षे या मंदिरांचे संशोधन सुरू आहे. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या संशोधकांना अभ्यास करूनही हाती लागलेल्या नाहीत. (Mysterious Shiva temples)

कैलास मंदिर

कैलास मंदिर हे भगवान शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर सर्वात मोठे रॉक-कट मंदिर आहे. १६ व्या शतकात छत्रपती संभाजीनगरच्या एलोरा गुंफामध्ये बनवण्यात आलं आहे. कैलास गुंफा मंदिराची रचना अशी एक अद्भूत बाब आहे, जी कुणालाही न पटणारी आहे. एका मोठ्या खडकातून हे मंदिर बनवण्यात आले आहे. पुरातत्ववाद्यांच्या माहितीनुसार, अर्थ जाणून घेण्यासाठी ३० मिलियन संस्कृत नक्षी आतापर्यंत डिकोड करण्यात आलेले नाही.

लिंगराज मंदिर

ओडिशातील भुवनेश्वर हे सर्वात मोठे मंदिर आहे. यामध्ये भगवान शिवला समर्पित ५४ मीटरचे हे मंदिर आहे. हे मंदिर १०९० ते ११०४ ई. दरम्यान निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हटले जाते की, गर्भ गृहाच्या आत, लिंगम स्वत: उत्पन्न झाले आहे, म्हणून त्यास स्वयंभू म्हटले जाते.

ऐरावतेश्‍वर मंदिर

तामिळनाडूमध्ये १२ व्या शतकात चोल राजांनी ऐरावतेश्‍वर मंदिराची निर्मिती केली होती. येथील मंदिराच्या पायऱ्या खूप गुढ आहेत. या पायऱ्यांमधून संगीत ऐकू येते. आश्चर्य वाटले ना? पण हे मंदिर इतक्या खास रितीने बनवण्यात आले की, या मंदिराच्या पायऱ्यांवर चढताना ध्वनी निर्माण होतात. संगीताच्या विविध ध्वनी इथे एकायला मिलतात.पण, या संगीताच्या मागे काय रहस्य आहे, हे आतापर्यंत कुणीही जाणू शकले नाही.

टिटलागढचे शिव मंदिर

असे म्हटले जाते की, ओडिसातील टिटलागढ येथे खूप उष्णता असते. याठिकाणी एक डोंगर आहे. ज्यावर शिव मंदिर स्थापित आहे. येथील खडकांमध्ये इतकी गर्मी असते की, लोकांना घामाच्या धारा लागतात. पण मंदिरावर उष्णतेचा कोणताही परिणाम होत नाही. मंदिरात इतकी थंडी आहे की, अनुभवणाऱ्यास आश्चर्य वाटेल. इतक्या गरमीमध्ये हे मंदिर इतके थंड कसे असू शकते? मंदिराच्या बाहेर येताच पुन्हा गरमीने बेहाल होतं.

निष्कलंक महादेव मंदिर

अरब समुद्राच्या किनारी निष्कलंक महादेव मंदिर एक प्रसिद्ध रहस्यमयी मंदिर आहे. हे मंदिर गुजरातच्या भावनगरमध्ये कोलियाक समुद्रकिनारी असून या पवित्र मंदिरात ५ शिवलिंग आहेत. हे स्वयंभू मंदिर असल्याचे म्हटले जाते. अरब सागराजवळ हे मंदिर असल्याने समुद्रात भरती आल्यावर शिवलिंग पाण्याने झाकून जाते. या मंदिराचा इतिहास महाभारत काळापासून जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी पांडवांनी अनेक वर्ष तप केलं होतं, असेही म्हटले जाते.

SCROLL FOR NEXT