Latest

ठाण्यात दुपारीच बंदची हवा निघाली; पण सकाळच्या सत्रात टीएमटी, रिक्षा राहिल्या बंद

अमृता चौगुले

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ ठाण्यात शनिवारी पुकारण्यात आलेला बंद दुपारीच मागे घेत असल्याचे या बंदला पाठिंबा देणाऱ्या शिंदे गट तसेच भाजपने जाहीर केले. या बंदची हवाच निघून गेली. बाजारपेठेत काही दुकानेच बंद ठेवण्यात आली होती. ठाण्यात शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने टीएमटी आणि रिक्षा सकाळच्या सत्रात बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचे मात्र चांगलेच हाल झाले. बंदचा फारसा प्रभाव ठाण्यात दिसून आला नसला तरी, वारकरी संप्रदायाच्यावतीने काढण्यात आलेल्या निषेध रॅलीमुळे काही प्रमाणात का होईना बंदला हवा मिळाली.

सुषमा अंधारे निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजपने आपला पाठिंबा दर्शवला होता. यावेळी दुपारी १२ च्या सुमारास मुख्य बाजारपेठेत असलेल्या विठ्ठल मंदिराजवळून वारकऱ्यांनी निषेध मोर्चा काढला या मोर्चात हरिनामाचा गजर करीत, हाती टाळ चिपळ्या घेऊन हा निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भाजपने देखील सहभाग घेतला होता. यावेळी, सुषमा अंधारे यांनी केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून त्याला आम्ही पाठींबा दिल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

दुसरीकडे बंदचे पडसाद सकाळपासूनच शहरात दिसून आले. मुख्य बाजेरपेठेसह शहरातील इतर भागातील काही आस्थापने बंद होते. तर या बंदमध्ये दुकानदार व इतर आस्थापांनीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. सकाळच्या सत्रत रिक्षा व इतर सार्वजनिक वाहतुकही बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. स्टेशन परिसरातून जाणाऱ्या रिक्षा देखील थांबविण्यात आल्या होत्या.

प्रवाशांना बसमधून उतरवले 

ठाणे बंदची हाक दिली असतांना एलबीएस मार्गावरुन येणा:या बेस्टच्या बस रहेजा तिनहात नाका भागात शिंदे गटाच्या पदाधिका:यांनी अडविल्याचे चित्र दिसून आले. तसेच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. तसेच रिक्षा देखीब बंद करण्यात आल्या.

काही शाळा राहिल्या बंद

ठाणे बंदचा फटका विद्याथ्र्याना बसू नये यासाठी शहरातील काही खाजगी शाळांनी स्वत:हून शनिवारी सुट्टी जाहीर केली. त्यामुळे विद्याथ्र्याचे हाल वाचल्याचे दिसून आले. परंतु काही शाळांमध्ये शनिवारी विद्याथ्र्याचा शेवटचा पेपर होता. परंतु सुट्टी जाहीर झाल्याने हा पेपर आता सोमवारी घेतला जाणार आहे.

दुपारी १ नंतर सर्व व्यवहार सुरळीत 

हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठाणे बंदची हवा ही दुपारी १ वाजेर्पयत दिसून आली. १२ वाजता निषेध रॅली काढण्यात आली. ती १ च्या सुमारास विसर्जीत झाल्यानंतर टप्याटप्याने शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठसह इतर भागातील आस्थापना देखील सुरु झाल्याचे दिसून आले.

राजकीय पुढा-यांचा भरणा

हिंदुत्ववादी संघटना तसेच वारक-यांनी काढलेल्या निषेध रॅलीत वारकरी कमी आणि राजकीय पुढा-यांचाच भरणा अधिक दिसून आला. भाजपच्या मंडळींच्या हातात तर निषेधाचे फलक होते, त्यावर भाजपचे कमळ फुलल्याचे दिसत होते. तर प्रत्येक राजकीय पुढाक-याच्या डोक्यावर वारक-यांची टोपी दिसून येत होती.

श्रध्द घालत केले पिंडदान 

वारकऱ्यांच्या निषेध रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महिला आघाडीने व इतर पदाधिका:यांनी जांभळी नाका येथे सुषमा अंधारे यांच्या विचारांचे श्रध्द घालत पिंडदान केले.

.हेही वाचा  

SCROLL FOR NEXT