Latest

Weather Update: पुढील ४ ते ५ दिवस राज्यात उष्ण लाटेसह अवकाळीचीही शक्यता

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गोवा, कोकणसह राज्यातील काही भागांत शनिवार २७ आणि रविवार २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेसह दमट वातावरण राहणार आहे. तसेच आजपासून (दि.२४) पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भातील तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. (Weather Update)

गोवा, कोकणात २७, २८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट

उत्तरेकडील गंगेच्या पश्चिम बंगाल, अंतर्गत कर्नाटक, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि किनारपट्टीच्या ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्ण ते गंभीर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दरम्यान उत्तर प्रदेश बिहार, झारखंड, कोकण आणि गोवा तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानम, रायलसीमा आणि तेलंगणामध्ये शनिवार (दि.२७) रविवार (दि.२८) उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. (Weather Update)

ईशान्य, वायव्य भारतात २६ ते २८ रोजी अवकाळी पाऊस

पुढील ५ दिवसांत पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान ईशान्य भारतात काही ठिकाणी २४, २७ आणि २८ एप्रिल रोजी गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य भारतात देखील २६ ते २८ एप्रिल दरम्यान गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT