Latest

Fuel price : इंधन दरात सलग सहाव्या दिवशी वाढ ; दिल्लीत पेट्रोल 110 रुपयांच्या समीप

नंदू लटके

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून सलग सहाव्या दिवशी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Fuel price  ) करण्यात आली. इंधन दरात झालेली वाढ प्रत्येकी 35 पैशांची आहे. ताज्या दरवाढीनंतर इंधन दराने नवा विक्रमी स्तर गाठला गेला आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 110 रुपयांच्या समीप म्हणजे 109.69 रुपयांवर गेले आहेत. ( (Fuel price ) दुसरीकडे डिझेल दराची शंभरीकडे वाटचाल सुरु असून हे दर 98.42 रुपयांवर गेले आहेत.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर स्थिर

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे प्रति बॅरलचे दर 84 डॉलर्सच्या आसपास स्थिर आहेत. मात्र तरीही तेल कंपन्यांकडून सातत्याने इंधन दरात वाढ सुरु आहे. जागतिक बाजारात सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडचे दर 83.52 डॉलर्सवर तर डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचे दर 83.20 रुपयांवर होते. मुंबईमध्ये आता पेट्रोल 115.50 रुपयांवर गेले असून डिझेल 106.62 रुपयांवर गेले आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोल 106.35 रुपयांवर तर डिझेल 102.59 रुपयांवर गेले आहे. प. बंगालमधील कोलकाता येथे हेच दर क्रमशः 110.15 व 101.56 रुपयांवर गेले आहेत.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT