Latest

Pathaan Trailer : ‘आ गया पठान…खत्म हुआ वनवास’; शाहरुख- दीपिकाच्या पठानचा ट्रेलर रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांचा आगामी 'पठान' गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर अनेकांनी आक्षेप घेतला. यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीनला कात्री लावली. याच दरम्यान चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Pathaan Trailer) चाहत्याच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शनसोबत जबरदस्त धुमधडाका पाहायला मिळतोय. याआधी एक दिवस चित्रपटातील कलाकारांची चार पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले होते.

अभिनेता दीपिका पादुकोणच्या इन्स्टाग्रामवर आगामी पठान चित्रपटाचा २ मिनिटे ३० सेकंदांचा धमाकेदार ट्रेलर ( Pathaan Trailer) नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा जॉनची धमाकेदार एन्ट्री आणि त्यानंतर अनेक बॉम्ब हल्ले आणि फायरिंग असे दाखविले आहे. शाहरुख खान पठाणमध्ये एका धाडसी सैनिकांची भूमिका साकारत असून तो देशाला दहशतवादी हल्ल्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात असतो. तर जॉन अब्राहमचा देशावर हल्ला करण्याची योजना आखत असतो. मात्र, शाहरूख त्याचे सर्व हल्ले परतवून लावत असतो. देशाला दहशतवादी हल्ल्यापासून वाचवण्यासाठी शाहरुख आपल्या जावाची पर्वा करत नाही. यात त्याला दीपिका पदुकोणची सोबत मिळतेय असे दाखविले आहे. चित्रपटाचा ट्रेलर अॅक्शन सीनने भरलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट 'बेशर्म रंग' या गाण्यातील भगव्या बिकिनीवरून वादात सापडला होता. अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. यानंतर काही सीन बदलण्यात आले. अनेक अडचणींचा सामना करत शेवटी चित्रपटाचा ट्रेलर चाहत्याच्या भेटीस आला. यामुळे चाहत्यांनी 'पठान तो आएगा… साथ में पताके भी लायेगा… ', 'आ गया पठान…खत्म हुआ वनवास' असे म्हणत भरभरून कौतुक केलं आहे. याआधी चित्रपटातील चार पोस्टर रिलीज केले होते. पठान हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात येत आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT