Latest

Jee Karda : तमन्ना भाटियाचा ‘जी करदा’ चा ट्रेलर लाँच

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दर्जेदार भूमिका साकारून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया 'जी करदा' ( Jee Karda ) या वेबसारिज चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'जी करदा' या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून तमन्नाचा अनोखा अंदाज आणि वेगळी भूमिका यातून पाहायला मिळाली आहे. या वेबसीरिजचे शूट सुरू झाल्यापासून तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सगळयांना खूप उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकता संपली असून धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यामुळे चाहत्यांना चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तम्मनाने तिच्या या भूमिकेबद्दल सांगितले आहे की, 'जी करदा' हा असा एक अनुभव आहे जो, मी शब्दात सांगू शकत नाही. मी एक मुंबईची मुलगी आहे आणि म्हणून ही कथा स्वतःला रीलेट करू शकले. ही भूमिका मी खूप एन्जॉय केली आणि म्हणून हा रोल मी खऱ्या अर्थाने जगले'.

लॉच झालेल्या ट्रेलरमध्ये सात मित्रांची गोष्ट, त्यातल्या कथा आणि बरच काही दाखविले आहे. आयुष्यातले चढ -उतार एकत्र सफर करताना या मित्रांची घडणारी गोष्ट यातून समोर आली आहे. सात मित्रांच्या जीवनाचा अनुभव घेण्यापासून ते प्रेमात पडून चुका करण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी यातून अनुभवयाला मिळणार आहेत.

दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित आणि अरुणिमा शर्मा दिग्दर्शित 'जी करदा' ही वेबसीरिजचे हुसैन दलाल आणि अब्बास दलाल यांनी सह-लेखन केले आहे. तमन्ना भाटियासोबत बेवसीरीजमध्ये आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी आणि सामवेदना सुवाल्का, सिमोन सिंग आणि मल्हार ठकार हे बालपणीचे मित्र आहेत. १५ जून २०२३ रोजी ही वेबसीरीज देश आणि प्रदेशात रिलीज होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT