Latest

ताजमहाल संबंधी ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अविनाश सुतार

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : इतिहासाच्या पुस्तकात ताजमहाल संदर्भात देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचा दावा करीत ती हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ताजमहालचे 'योग्य वय' निश्चित करण्यासह बांधकामासंबंधी इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आलेली चुकीची माहिती हटवण्याचे निर्देश पुरातत्व विभागाला (एएसआय) देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका सुनावणी योग्य नाही, अशा शब्दांत याचिकाकर्त्याला खडसावले.

ही कशाप्रकारची याचिका आहे? असा सवाल खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारला. ऐतिहासिक तथ्य खरे आहेत की खोटे हे न्यायालय कसे तपासणार? असा सवाल खंडपीठाने उपस्थित करीत याचिका मागे घेण्यास सांगितले. यासंदर्भात एएसआय कडे जाण्याची मुभा न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने अशाच प्रकारच्या एका याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. ताजमहालचा वास्तविक इतिहासाचा शोध घेण्यासह स्मारकामध्ये बंद असलेल्या खोल्या उघडण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

हेही वाचलंत का ?  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT