Latest

राज्‍यसभेच्‍या सहाव्‍या जागेसाठी शिवसेनेचाच उमेदवार असेल : संजय राऊत

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

आम्‍ही छत्रपती घराण्‍याचा मान  राखला आहे. छत्रपती घराण्‍याचा मान आहे म्‍हणूनच संभाजीराजे यांना शिवसेनेने राज्‍यसभेची उमेदवारी देवू केली आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. सहावा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल, अशी आमची भूमिका असल्‍याचा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

यावेळी संजय राऊत म्‍हणाले, राज्‍यसभा निवडणुकीसाठी आम्‍ही संभाजीराजे यांना शिवसेनेने उमेदवारी देवू केली आहे. आम्‍ही छत्रपती घराण्‍याचा मान राखला आहे. याबाबत मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतली.

विक्रांत घोटाळा करत देशाची मानहानी करणार्‍या किरीट सोमय्‍या यांनी माझ्‍यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. ते जामिनावर सुटलेले आरोपी आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या आरोपांकडे आम्‍ही लक्ष देत नाही, असेही त्‍यांनी सांगितले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उत्तर प्रदेश दौराला विरोध करण्‍यासाठी राष्‍ट्रवादीने रसद कशी पुरवली, असा सवाल करत दिल्‍लीमध्‍ये सर्वपक्षीय खासदारांबरोबर संपर्क असतो. त्‍यामुळे मनसेचा आरोपच चुकीचा असल्‍याचेही संजय राऊत म्‍हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT