Latest

विधानमंडळातील शिवसेना कार्यालयावर ‘शिंदे गटा’चा ताबा

मोनिका क्षीरसागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट जास्तच आक्रमक झाला असून, शिंदे गटाच्या आमदारांनी विधानमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदारांनी सोमवारी(दि.20) सकाळीच कार्यालय ताब्यात घेतले आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे गटाकडे आलेले विधानमंडळातील पक्ष कार्यालय आपल्याला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली होती. त्यानंतर लगेच शिंदे गटाने हा ताबा घेतला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले, आमदार सदा सरवणकर आदींनी कार्यालयाचा ताबा घेतला.

दरम्यान गोगावले यांनी प्रतोदांसाठी असलेल्या खुर्चीत बसून काम सुरू केले आहे. आम्ही कार्यालय बळकावले नाही तर, आज आमच्या कार्यालयात प्रवेश केला आणि आज शिवसैनिक शिवसेनेच्या कार्यालयात आले आहेत, असे गोगावले म्हणाले. यानंतर शिंदे गट मंत्रालयासमोर शिवालय या ठाकरे गटाच्या कार्यालयावरही ताबा मिळविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT