Latest

Sam Bahadur : विक्कीच्या आगामी ‘सॅम बहादूर’च्या रिलीज डेटची घोषणा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'सॅम बहादूर' ( Sam Bahadur ) हा चित्रपट घेऊन येत आहे. सध्या या चित्रपटाच्या टिझरसोबत रिलीज डेट समोर आली आहे. यातून या चित्रपटासाठी ३६५ दिवस, म्हणजे, १ वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. लग्नानंतर विक्की या चित्रपटात दिसणार असल्याचे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लग्नानंतर विक्की कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट १६ डिसेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. यानंतर विक्कीचा आणखी एक धमाकेदार आणि नवीन आगामी 'सॅम बहादूर' ( Sam Bahadur ) हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात विक्कीने सॅम माणेक शॉ यांची मुख्य भूमिका साकारली आहे. याच दरम्यान विक्कीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक 'सॅम बहादूर' या चित्रपटाचा टिझर दाखवत रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

विक्कीने शेअर केलेल्या टिझरमध्ये आता ३६५ दिवस बाकी म्हणजे, पुढच्या वर्षी १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे. या व्हिडिओत सॅम अनेक सैनिकांच्या मधून पाठमोरा चालताना दिसतोय. तर सर्वजण यावेळी सैनिकाच्या वेषभूषेत दिसतात. हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा देशाचे पहिले फिल्ड सॅम माणेक शॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विक्कीसोबत फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सान्याने चित्रपटात सॅम माणेक शॉ यांच्या पत्नी सिल्लू मंकशॉची तर फातिमाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर याआधी विक्कीचा 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट १६ डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. या चित्रपटात विक्कीसोबत भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT