Latest

सावधान! ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची ‘लिंक’ आल्यास ओपन करू नका, नाहीतर…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. चित्रपट पाहण्यासाठी अनेक जण चित्रपटगृहात गेले आहेत, तर अनेकजण अजूनही चित्रपट पाहण्याचा बेत आखत आहेत. काश्मीर फाईल्सबाबत प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कश्मीर फाइल्स प्रदर्शित करण्यात आलेली बहुतेक चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत. देशातील अनेक भागातील सिनेमागृहांमध्ये काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाच्या शोची तिकिटे लोकांना सहज मिळत नाहीत, असे अनेकांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत लोक आता 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहण्यासाठी पर्यायी माध्यमाच्या शोधात आहेत.

देशातील अनेक राज्यांमध्ये 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files)च्या चर्चेनंतर आता या चित्रपटाने हॅकर्सचे लक्ष वेधले आहे. तुमच्या मोबाईलवर 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपट पाहण्यासाठी कोणतीही लिंक आली असेल तर तुम्हाला त्यावर काळजीपूर्वक क्लिक करावे लागेल. द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहण्यासाठी सोशल मीडिया साइट्वर विविध लिंक्स पाठवण्यात येत आहेत. यातील बहुतांश लिंक्स देशाच्या विविध राज्यातील हॅकर्सकडून सातत्याने पाठवल्या जात आहेत. खासकरून अशा लिंक वॉट्सॲपवरून मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. काहीकण अशा आमीषाला बळी पडल्याचे दिसत आहे.

बँक खाते हॅक केले होऊ शकते

काश्मीर फाइल्स चित्रपट ओपन केल्यास लिंकद्वारे हॅकर्स तुमचे बँक खाते हॅक करू शकतात, त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या अशा लिंक्स ओपन करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी काळजी घेणे अवश्यक आहे. आजकाल द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहण्यासाठी इतकी मागणी आहे की अनेकांना तो घरी बसून त्यांच्या मोबाईलवर मोफत पाहायचा आहे. याचा फायदा घेत तुमचे बँक खाते हॅक करण्यासाठी सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत.

सायबर गुन्हेगार कसे काम करतात?

सायबर गुन्हेगार द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या नावानेही अशा लिंक्स पाठवत आहेत, ज्यावर क्लिक करताच तुमचा फोन हॅक होतो. यानंतर, त्या फोनचा तपशील त्या सायबर गुन्हेगरांपर्यंत पोहोचतो आणि त्याद्वारे ते तुमच्या मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यातून पैसे चोरतात. देशातील अनेक भागातील पोलिस अधिकाऱ्यांनीही याबाबत लोकांना अलर्ट जारी केला आहे.

नोएडा येथील एका पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी लोकांना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अज्ञात लोकांकडून पाठवलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापासून सावध केले. अधिकारी म्हणाले की, सायबर गुन्हेगार लोकप्रिय चित्रपटाची लिंक पाठवून विनामूल्य पाहण्याच्या बहाण्याने लिंक पाठवू शकतात. ही लिंक वापरकर्त्यांने ओपन केल्यास त्याचा फोन हॅक होऊ शकतो आणि त्यांच्या मोबाइल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यातून पैसे चोरी केले जाऊ शकतात. अलीकडेच २४ तासांत एकाच पोलिस ठाण्यात तीन जणांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

आणखी वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT