Latest

Ganapath : तो भयंकर आहे, म्हणत क्रितीचा ॲक्शन अवताराची पहिली झलक समोर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री टायगर श्रॉफ, अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा आगामी 'गणपत – अ हिरो इज बॉर्न' ( Ganapath ) हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. दरम्यान चित्रपटातील टायगर श्रॉफचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता धमाकेदार क्रिती पहिला लूक समोर आला आहे. क्रितीचा हा लूक पाहून चाहत्यांनी तिच्यावर कॉमेन्टचा वर्षाव केला आहे.

संबधित बातम्या

अभिनेत्री क्रिती सेनॉनने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर 'गणपत – अ हिरो इज बॉर्न' ( Ganapath ) या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केलं आहे. क्रितीने ब्लॅक रंगाच्या कार्गो पॅंटवर ब्लॅक स्लिव्हलेस क्रॉप टॉप परिधान केली आहे. याशिवाय तिच्या हातात मार्शल कराटे स्टिक असून ती कॅमेऱ्याकडे एकटक पाहताना दिसतेय. क्रितीच्या ग्लॅमरससोबत डॅशिंग अदांज चाहत्यांना भावला आहे.

या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये क्रितीने 'तो भयंकर आहे, तो अजिंक्य आहे, मारायला तयार आहे. या दसऱ्याला, २० ऑक्टोबर रोजी गणपथ चित्रपटगृहात दाखल होत आहे.' असे म्हटलं आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी क्रितीचे भरभरून कौतुक केलं आहे.

एका युजर्सने 'तुमच्या पहिला अॅक्शन चित्रपटाची आम्ही प्रतीक्षा करू शकत होतो', 'पहिला अॅक्शन चित्रपट समीक्षक!' यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहे. 'गणपत – अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. गणपथ हा चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT