Latest

राईट बंधूंनी नव्हे, भारद्वाज मुनींच्या शास्त्रात विमानाचा शोध, NCERT अभ्यासक्रमासाठी राज्यांच्या सूचना

सोनाली जाधव

नवी दिल्ली: वृत्तसंस्था, इंग्रज रसायनशास्त्रज्ञ जॉन डॉल्टन हे अणू सिद्धांताचे जनक असल्याचे विद्यार्थ्यांना शिकवले जाऊ नये. त्यांच्याऐवजी त्यांच्या खूप आधीच हा शोध लावणाऱ्या महर्षी कणाद यांना पदार्थाच्या सर्वात लहान अविभाज्य कणाबाबतच्या शोधाचे श्रेय द्यावे, अशा सूचना यूपी (उत्तर प्रदेश), हरियाणा तसेच झारखंड राज्य सरकारकडून एनसीईआरटीला (NCERT) प्राप्त झाल्या आहेत.

कणाद यांनी डॉल्टन यांच्याआधीच अणूबाबत सारे काही सांगितले होते. कणाद यांनीच अणू व त्याचे संयुग स्वरूप, गती व रासायनिक प्रक्रिया आदींची तपशीलवार व्याख्या केली होती. कणाद यांनीच न्यूटन यांच्याही आधी वैशेषिक सूत्राच्या माध्यमातून गतीचे नियम पहिल्यांदा सांगितले होते, असेही या सूचनांतून स्पष्ट करण्यात आले आहे. एनसीईआरटीची नवी क्रमिक पुस्तके तयार करण्यासाठी २५ मुख्य समूह स्थापन करण्यात आले आहेत. 'भारत का ज्ञान' हा त्यापैकी एक समूह आहे. बहुतांश राज्य सरकारांनी एका वर्षात एनसीईआरटीकडे अनेक सूचना पाठवल्या आहेत. गुजरात सरकारने वैदिक गणिताची सूत्रे ही कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या तोडीची असल्याचे नमूद करून ती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत. उपनिषदे, गीता, महाभारत, रामायणाचा सार हे विषय इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा भाग असावेत, अशी सूचना मध्य प्रदेश सरकारकडून आली आहे…

कणाद : राईट बंधू नव्हे, भारद्वाज मुनी!

राईट बंधूंच्याही हजारो वर्षे आधी इ.स. पूर्व चौथ्या शतकामध्ये भारद्वाज मुनींनी वैमानिक शास्त्र लिहिले. अनेक प्रकारच्या विमानांचा उल्लेख त्यात आहे. स्कंद पुराणानुसार कर्दम ऋषींनी त्यांच्या पत्नीसाठी कुठेही ये-जा करणारे विमान डिझाईन केले होते, असेही उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून सूचित करण्यात आले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT