Latest

Watch Video : आर्किमिडीज सिद्धांतामुळेच वाचला खड्ड्यात पडलेला हत्ती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : माणसाने आपल्या हुशारीने अनेकदा संकटात अडकलेल्या प्राण्यांची मदत केली आहे आणि त्यांचा जीव वाचवला आहे. त्याचंच एक उदाहरण समोर आलेलं आहे. एका खोल खड्ड्यात पडलेल्या हत्तीला वाचविण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या अफलातून प्रयत्नाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यामध्ये हत्तीला वाचविण्यासाठी आर्किमिडीजच्या सिद्धांत्ताचा वापर केलेला दिसून आलेला आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहवा लागेल. (Watch Video)

वनकर्मचाऱ्यांचं हे धाडसी रेस्क्यूचा व्हिडिओ आईएफएस अधिकारी परवीन कस्वां यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या मिदनापूरमधील आहे. येथे एका खोल खड्ड्यात हत्ती पडला होता. खड्डा खूप खोल होता, त्यामुळे हत्ती त्यात अडकून पडलेला होता. त्यानंतर हत्तीला वाचविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना अफलातून कल्पना सुचली. त्यांनी तो खड्डा पाण्याने भरला. जसं जसं पाणी भरलं गेलं तसा तसा हत्ती पाण्यात तरंगू लागला. हत्ती पाण्यावर तरंगू लागल्यावर रस्सीच्या मदतीने हत्तीला वनकर्मचाऱ्यांनी खड्ड्याबाहेर काढले.

वनविभागाला सकाळी १ वाजता हत्ती खड्ड्यात पडल्याची बातमी मिळालेली होती. त्यानंतर बचाव अभियान चालविण्यात आलं. तब्बल ४ तासांच्या प्रयत्नानंतर हत्तीला बाहेर काढण्यात यश आलं. हा व्हिडिओ ट्विट करताना परवीन कस्वांनी लिहिलं आहे की, "मिदनापूरमध्ये एक हत्ती खोल खोड्ड्यात पडलेला होता. आता त्याला कसं वाचवावं… आर्किमिडीजच्या सिद्धांत्ताचा वापर करून… विश्वास बसत नाही ना… तर पहा व्हिडिओ…" (Watch Video)

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "वनविभागाला रात्री एक वाजता याबाबत माहिती मिळाली. डीएफओ संदीप बेरवाल आणि एडीएफओ यांच्या नेतृत्वाखाली हे बचाव अभियान चालविण्यात आलं. पहाटे ४ वाजेपर्यंत हे अभियान यशस्वी करण्यात आलं." आर्किमिडीज यांनी तयार केलेल्या सिद्धांताचा असं सांगतो की, "एखाद्या पदार्थाचे तो द्रवात बुडालेला असताना केलेले वजन, हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा कमी भरते. हे कमी झालेले वजन त्या पदार्थाने बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजनाइतके कमी होते. यालाच 'आर्किमिडीजचा सिद्धांत' असे म्हणतात."

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT