Latest

Reservation: केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी; मराठा, जाट, गुजर नेत्यांची मागणी

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये आज (दि. ३०) जाट, गुजर आणि मराठा नेत्यांची आरक्षणासंदर्भात संयुक्त बैठक झाली. 'केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी', असा सुर उपस्थित सर्वच नेत्यांकडून या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय जाट महासभा, अखिल भारतीय गुजर महासभा या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व संघटनांची १३ जानेवारीला पुन्हा एक बैठक दिल्ली येथे होणार आहे. Reservation

मराठा समाज, जाट समाज आणि गुजर समाजाची एक संयुक्त समिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे या सभेचे समन्वयक कामगार नेते राजेश निंबाळकर यांनी सांगितले. सविस्तर चर्चेसाठी १३ जानेवारीला पुन्हा दिल्ली येथे सर्व नेत्यांची एक बैठक होणार आहे. आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारने ताबडतोब वाढवावी, या प्रमुख मागणीसाठी या बैठकीत देशभरातील जाट, मराठा, गुजर समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यानी दिली. Reservation

या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, सचिव संभाजी दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानवटे, गजेंद्र भोंसले, दिलीप धन्दरे, शाम पवार, मयूर गुजर तर अखिल भारतीय जाट महासभेचे महासचिव युद्धवीर सिंह, भारतीय किसान यूनियनचे राकेशसिंह टिकैत, अखिल भारतीय गुजर महासभेचे सुभाष गुजर, परविंदर अवाना आदी नेतेमंडळी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT