Latest

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा बिगुल वाजला ! या दिवशी पार पडणार स्पर्धा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टच्या वतीने 37 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन रविवार दि. 3 डिसेंबर रोजी पहाटे 3.3. वाजता सुरु होणार आहे. 'पर्यावरण संवर्धनासाठी पळा' हे घोषवाक्य असणार असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. अभय छाजेड आणि रोहन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सणस मैदान येथील हॉटेल विश्व चौकातून या 42 किमीच्या महिला – पुरुष पूर्ण मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ करण्यात येईल तसेच पहाटे 4 वाजता महिला – पुरुष अर्ध मॅरेथॉन सुरु होईल. ही पूर्ण मॅरेथॉन सणस मैदान हॉटेल विश्व चौक – सारसबाग – सेनापती बापट पुतळा- सिंहगड मार्ग- नांदेड सिटीतील सर्कल येथे वळसा घालून सणस मैदान येथे परत येईल. व पुन्हा त्याच मार्गाने दुसरी फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे 42. 195 किमीचा टप्पा पार करेल.

अर्ध मॅरेथॉन सणस मैदान – सारसबाग -सेनापती बापट पुतळा- सिंहगड मार्ग – नांदेड सिटी सर्कल येथे वळसा घालून त्याच मार्गाने सणस मैदान येथे 21 किमीचा टप्पा पार करेल . याशिवाय 10 किमी, 5 किमी, व्हील चेअर, फॅमिली रन देखील असणार आहेत. प्रवेशाची अंतिम तारीख 20 नोवेंबर असून मॅरेथॉन भवन, पर्वती येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगर पालिकेतर्फे 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. इथियोपिया, किनिया, टांझानिया, मौरिशिअस इत्यादी देशांतून आत्तापर्यंत 60 हून अधिक स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. याशिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, बोम्बे सॅपर्स, एसआरपीएफ आणि एनडीए यांच्याही प्रवेशिका येत आहेत.

या संपूर्ण मार्गाची मोजणी शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, उत्तम प्रकाश योजना यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा संपल्यानंतर सणस मैदान येथे सकाळी 8 वाजता पारितोषिक वितरण होणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT