Latest

सातारा : केळवली धबधब्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह चार दिवसांनी सापडला

निलेश पोतदार

परळी; पुढारी वृत्तसेवा : केळवली (ता. सातारा) येथील धबधबा परिसरात (विकासनगर) राहुल माने (वय 18) व त्याचे मित्र हे शुक्रवारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी पोहण्याचा मोह न अवरल्याने राहुलही मित्रांसमवेत केळवली धबधब्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्‍यात यश आले नाही.

त्यानंतर सर्व मुले सातारला निघून आली. कुटुंबियांना ही घटना समजताच पोलिसांना कळवण्यात आले. तोपर्यंत रात्र होत आली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी (शनिवार) शोध मोहिम सुरू केली. धबधबा परिसरात शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधकार्य अविरतपणे सुरू ठेवले.

शुक्रवारपासून राहुल माने या युवकाचा पोलीस यंत्रणा शोध घेत होती. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमची मोलाची साथ मिळाली. मात्र वरुन कोसळणारा धबधबा व मोठ- मोठे दगड यामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर आज (मंगळवार) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास धबधबा परिसरात केळवलीचे पोलीस पाटील काही ग्रामस्थ शोध घेत होते. या वेळी धबधब्यापासून सुमारे सत्तर फूट अंतरावर बेपत्ता युवकाचा मृतदेह दगडा जवळ दिसला. यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT