पुणे : लष्करी सेवेत स्वदेशी शस्त्रे दाखल! ‘डीआरडीओ’चे तंत्रज्ञान सामर्थ्य भारतीयांसाठी अभिमानास्पद | पुढारी

पुणे : लष्करी सेवेत स्वदेशी शस्त्रे दाखल! ‘डीआरडीओ’चे तंत्रज्ञान सामर्थ्य भारतीयांसाठी अभिमानास्पद

पुणे; पुढारी वृतसेवा: भारतीय उद्योजकांच्या तंत्राला विकसित करून लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेवर लष्करात स्वदेशी बनावटीची ‘गायडेड पिनाका रॉकेट मिसाईल व अँटी टँक माईंन’सारखी शस्त्रे दाखल झाली. लष्करी सेवेत ‘डीआरडीओ’ चे तंत्रज्ञान सामर्थ्य भारतीयांसाठी अभिमानास्पद म्हणावे लागेल. कोणत्याही देशाचे सामर्थ्य आणि त्या देशाची मजबुती त्या देशाचे सैन्य आणि विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती यावरून होत असते. तीच शस्त्रे कारगिल विजयदिनी सेवेत दाखल होणे हेच भारतीयांचे यश म्हणावे लागेल, असे मत तज्ज्ञांनी कारगीर विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.

जेव्हा देशाची सैन्यशक्ती आणि देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्षमता ही परस्पर सहयोगी आधारावर निर्माण होत असतील तर त्या देशाची ताकद ही अधिक वाढत असते. ‘डीआरडीओ’ हे देशाच्या संरक्षणासंबंधी विविध प्रकारचे संशोधन करत असते. तसेच देशाच्या संरक्षणासंबंधीच्या तंत्रज्ञानाला अधिक मजबूत करत असते, म्हणून लष्करी सेवेत त्यांचा मोठा हातभार
असल्याचे दिसते.

अनेक क्षेपणास्त्रे विकसित
डीआरडीओने भारताच्या अग्नी, पृथ्वी, आकाश, त्रिशूल आणि नाग यांसारखी अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. जेणेकरून आपल्या देशाची सुरक्षाशक्ती अधिक बळकट होण्यास मदत झाली. याचबरोबर लढाऊ विमान, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणेही विकसित केलेली आहेत. संरक्षण दलातील तज्ज्ञांच्या मते, ‘देशाचा सर्वाधिक खर्च सरक्षणावर होतो. म्हणूनच मेक इन इंडिया संकल्पनेवर स्वदेशी बनावटीची शस्त्रे लष्करात दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला. देशातील बंगळूर, मुंबई, गुजरातसह इतर उद्योजकांनीही तयारी दाखवत शस्त्रासह ट्रान्सफॉर्मर रिसिव्हर सॉफ्टवेअर, जवानांसाठी सुरक्षा जॅकेट देत देशसेवेत हातभार लावला.’

Back to top button