Latest

Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० जण ताब्यात

मोहन कारंडे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : थर्टीफस्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी होणाऱ्या बेकायदेशीर ड्रग्ज पार्टीवर आपली नजर रोवली आहे. रविवारी मध्यरात्री ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात होणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने धाड टाकली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके व त्यांच्या पथकाने सुमारे १०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या पार्टीत दारुसह एलएसडी, गांजा, चरस आदींचा वापर होत होता. ही कारवाई पहाटे पर्यंत सुरू होती. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, न्यू इयर पार्टीसाठी कोकेन विक्री करणाऱ्या एका नायझेरियन नागरिकाला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा रेव्ह पार्टीवर धाड टाकल्याने अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT