Latest

Elon Musk and Coco-Cola : एलॉन मस्‍क ट्‍विटरनंतर विकत घेणार कोका-कोला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क यांनी नुकतीच सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतली.. टेस्ला कंपनीचे सीईओ असणार एलॉन मस्क आणि ट्विटर इंक यांच्यामध्ये ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला व्यवहार झाला.  मस्क यांनी ट्विटर इंक कपंनीचे ५४.२० डॉलर रोखीमध्ये प्रति शेअर विकत घेतले. ( Elon Musk and Coco-Cola )आता यानंतर त्‍यांनी कोका-कोला कंपनी विकत घेण्‍याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात त्‍यांनी एक ट्वीट केले आहे.

Elon Musk and Coco-Cola : ट्‍विटला तब्‍बल १० लाख लाईक्‍स

एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आहे की, पुढील वेळीस मी कोका-कोला कंपनी खरेदी करणार आहे. अमेरिकेतील प्रख्‍यात उद्‍योगपती एशा ग्रिग्‍स कँडलर यांनी १८८८ मध्‍ये कोका-कोला करण्‍याची प्रक्रिया एका केमिस्‍टकडून विकत घेतली होती. यानंतर काही वर्षांमध्‍ये कोका-कोला कंपनीही जगातील मोठी उलाढाल असणारी कंपनी बनली. आता मस्‍क यांनी ही कंपनी विकत घेण्‍याचे संकेत देणारे ट्‍विट केले. याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या ट्‍विटला तब्‍बल १० लाख लाईक्‍स मिळाल्‍या आहेत. तर अडीच लाख जणांनी त्‍याला रिट्‍वीट केले आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

SCROLL FOR NEXT