Latest

Terrorists Attack : पूंछ दहशतवादी हल्ल्यात नवे खुलासे; 6 स्थानिकांनी केली दहशतवाद्यांना मदत

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मू काश्मीरच्या पूंछ येथे गेल्या आठवड्यात लष्कराच्या ट्रकवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यातील Terrorists Attack नवीन माहिती समोर आली आहे. हे नवीन खुलासे धक्कादायक आहेत. नवीन मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांना 6 स्थानिक लोकांनी मदत केली होती. सर्व आरोपी एकाच कुटुंबातील आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील भिंबरगली आणि पूँछदरम्यान लष्करी वाहनावर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला. या घटनेत पाच जवान शहीद झाले होते. तसेच लष्कराचा ट्रक जळून भस्मसात झाला आहे. Terrorists Attack दहशतवाद्यांच्या ट्रकला लक्ष्य करण्यासाठी 7.62 मिमी स्टील कोअर बुलेट आणि आयईडीचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या 6 जणांचा सहभाग असल्याची बातमी आहे, त्यापैकी एकाचे संपूर्ण कुटुंब या कटात सामील होते.

Terrorists Attack : हल्ल्यानंतर 221 संशयित ताब्यात, 6 आरोपींची ओळख पटली, तिघांनी मान्य केले…

पोलिस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी याबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की या 6 दहशतवाद्यांना संपूर्ण नियोजनासह शस्त्रास्त्र, दारूगोळा, हातबॉम्ब आणि रोख रकमेसह रसद मदत केली होती. सिंग यांनी सांगितले की हल्ल्यानंतर जवळपास 221 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पूंछ हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींची ओळख पटवली आहे. त्यापैकी निसार अहमद, फरीद अहमद आणि मुश्ताक अहमद यांनी ते मेंढर उपविभागातील असल्याचे मान्य केले आहे.

Terrorists Attack : आरोपी निसारचे संपूर्ण कुटुंब कटात सहभागी

डीजीपी म्हणाले चौकशीत हे उघड झाले आहे की , आरोपी निसार अहमद याचे सर्व कुटुंब कटात सहभागी आहेत. आरोपी निसारला यापूर्वी 1990 च्या दशकात भूमिगत कार्य करणारा असल्याने पोलिसांनी यापूर्वीही त्याला उचलले होते. यामुळे यावेळी देखील तो संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून निसार अहमद आणि त्याचे कुटुंब दहशतवाद्यांना अन्न, पाणी आणि इतर सुविधा पुरवत होते. पाकिस्तानने ड्रोनद्वारे एक माल पाठवला होता जो निसारने दहशतवाद्यांना दिला होता. या मालामध्ये रोख रक्कम, शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि हातबॉम्ब यांचा समावेश होता.

Terrorists Attack : आरोपींनी भाट धुरियनच्या जंगलात तळ ठोकला

या मॉड्युलच्या खुलाशामुळे आता पुढचा मार्ग मोकळा झाल्याचे पोलीस महासंचालकांचे म्हणणे आहे. आता आरोपींचा ठावठिकाणा आणि रसद कशी लावली आदींचा तपास केला जाणार आहे. डीजीपी म्हणाले की हल्लेखोर दोन-तीन महिन्यांपासून भट धुरियनच्या जंगलातील नैसर्गिक गुहांमध्ये तळ ठोकून असतील. जंगलाजवळूनच हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT