Latest

Terror Funding : मुंबईत दहशतवादी कट रचण्यासाठी दाऊदने २५ लाख पाठवले! आरोपपत्रात ‘एनआयए’चा मोठा खुलासा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलने मुंबईत दहशतवादी कारवाया करण्यासाठी दुबईमार्गे पाकिस्तानातून २५ लाख रुपये पाठवले, असा मोठा खुलासा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)  आरोपपत्रात केला आहे. टेरर फंडिंगबाबत हवालातून पैसे सुरतमार्गे मुंबईत पोहोचले असल्याचेही 'एनआयए'ने स्पष्ट स्पष्ट केले आहे.

 'एनआयए'ने शनिवारी दाऊद, शकील, त्याचा मेहुणा मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट,आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत दिले आहे. यामध्ये म्हटलं आहे की. मुंबईत दहशतवादी घटना घडवण्यासाठी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलने पाकिस्तानातून 25 लाख रुपये हवालातून पाठवले.  हा पैसा सुरतमार्गे भारतात आला. नंतर मुंबईतून हे पैसे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना पोहोचवले. शब्बीरने 5 लाख रुपये आपल्याकडे ठेवले होते. उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. 9 मे 2022 रोजी शब्बीरच्या घराच्या झडतीदरम्यान 5 लाख रुपये जप्त करण्यात आले.

 आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क आणि डी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित प्रकरणात शब्बीरने 29 एप्रिल रोजी आरिफच्या सांगण्यावरून मालाड (पूर्व) येथील हवाला ऑपरेटरकडून दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसे घेतले होते.

चार वर्षात करोडो रुपये पाठवले

'एनआयए'ने आरोपपत्रात म्हटले आहे की, "गेल्या चार वर्षांत सुमारे १२ ते १३ कोटी रुपये दहशतवादी कारवाईंसाठी भारतात पाठवले गेले. रशीद मारफानी उर्फ ​​रशीद भाई हा दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे हवाला मनी ट्रान्सफरचे भारतात पाठवण्याचे काम करत होता. आरिफ आणि शब्बीर यांनी हवाला चॅनलच्या माध्यमातून एका दशकात साक्षीदाराकडून सुमारे 16 कोटी रुपये उकळले."

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT