इरफान पठाणच्या ट्विटने पाकिस्तानला झोंबली मिर्ची

इरफान पठाणच्या ट्विटने पाकिस्तानला झोंबली मिर्ची
Published on
Updated on

सिडनी; वृत्तसंस्था :  भारताचा माजी वेगवान गोलंदाज व समालोचक इरफान पठाणच्या ट्विटची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. इरफानच्या एका वाक्याने पाकिस्तानला चांगलीच मिर्ची झोंबली आहे. टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलपूर्वी इरफानने केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानने नोंदविलेल्या रविवारच्या विजयानंतर इरफानने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने म्हटले की, बाजूच्या देशातील ट्विटर अकाऊंट फक्त रविवारच्याच नावावर जिवंत आहेत. पाकिस्तान हा रविवार असेल तरच विजय मिळवतो, असेही इरफानला यावेळी म्हणायचे आहे. त्यामुळे पाकिस्तानचे चाहते इरफानवर खवळले आहेत. त्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आता पाकिस्तानचा सेमीफायनलचा सामना न्यूझीलंडबरोबर बुधवारी होणार असल्यामुळे पाकिस्तान विजयी होणार की नाही? याची आता उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news