पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री शिल्पा तुळसकर सध्या तेव्हा तू तशी या मालिकेमुळे चर्चेत आलीय. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तिने आपली ओळख निर्माण केलीय. अनेक मालिकांमध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे. (shilpa tulasakar) ९ मलबार हिल, बंधन, व्योमकेश बक्षी, वीर शिवाजी, रिश्ते, कवच अशा मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. तर देवकी, डोंबिवली फास्ट, कालचक्र आणि बॉईज यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकलीय. जावई माझा भला, लहानपण देगा देवा यांसारख्या नाटकांमधून शिल्पाने स्वत:ला सिध्द केलंय. तसेच जाना ना दिल से दूर, देवों के देव – महादेव, लेडीज स्पेशल, दिल मिल गए यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही ती दिसली. (shilpa tulasakar)
शिल्पाच्या देवकी, राजनंदिनी अशा भूमिका गाजल्या आहेत. ती २०१८ मध्ये टीव्ही मालिका 'तुला पाहते रे' मध्येही झळकली होती. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
या मालिकेत शिल्पा यांनी साकारलेली राजनंदिनी सरंजामेची भूमिका प्रचंड गाजली. आता सध्या छोट्या वाहिनीवर सुरू असलेली मालिका 'तू तेव्हा तशी'ही चर्चेत आहे.
शिल्पाला या मालिकेत एका मुलीची आई दाखवण्यात आलीय. तर तिच्यासोबत स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. वयाची चाळीशी पार केलेला सौरभ म्हणजेच स्वप्नील जोशी आणि अनामिका म्हणजेच शिल्पा तुळसकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांचा जन्म १० मार्च, १९७७ रोजी मुंबईत झाला होता.
शिल्पा यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा थिएटर नाटकामध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. तसेच त्या अनेक जाहिरातींमध्येही झळकल्या आहेत. शिल्पा यांनी 'ब्योमकेश बक्षी' हिंदी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. शांती, हद कर दी, लेडीज स्पेशल, क्यूं होता है प्यार, जाना ना दिल से दूर, एक दीवाना था, ये है मोहब्बतें, तुला पाहते रे, डोंबिवली फास्ट, कालचक्र, बॉईज आदी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडलीय.